पावणादेवी क्रिकेट मंडळ सोनाळीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

Edited by:
Published on: December 24, 2023 11:19 AM
views 233  views

वैभववाडी : सोनाळी येथील पावणादेवी क्रिकेट मंडळ रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट स्पर्धेसह रक्तदान शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 

तालुक्यातील सोनाळी येथील तरुणांनी २५ वर्षांपूर्वी पावणादेवी क्रिकेट मंडळाची स्थापना केली होती.दरवर्षी या मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. यावर्षी मंडळाचा रौप्यमस्वयी वर्ष साजरा होत आहे.  या निमित्ताने विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रमांच आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दिनांक 23 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर  27  ते 29 डिसेंबर पर्यंत क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सत्यनारायण महापूजा, महिलांसाठी हळदीकुंकू आदी कार्यक्रम होणार आहेत.याचदिवशी  सायंकाळी महाप्रसाद, क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण ,मान्यवरांचा सत्कार व मंडळातील ज्येष्ठ सभासदांचा सत्कार केला जाणार आहे.रात्री" कोकणचा साज, संगमेश्वरी बाज" हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा तालुकावासी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.