आबा महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

Edited by:
Published on: April 21, 2025 17:33 PM
views 163  views

सावंतवाडी : प. पू. सद्गुरु आबा महाराज यांच्या २७ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी इन्सुली बिलेवाडी येथील सद्गुरू आबा महाराज स्मृती मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त सकाळी १० वाजता पादुका पूजन व अभिषेक, सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजा, आरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता स्थानिक भजने, रात्रौ ९ वाजता मान्यवरांचा सन्मान, रात्री ९:३० वाजता गणेश हिर्लेकर लिखित श्री सातेरी शांतादुर्गा नाट्य मंडळ (परमे) यांचे 'रक्ताचा टिळा' हे तीन अंकी नाटक होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन इन्सुली बिलेवाडी येथील सद्गुरु कला व नाट्य भजन मंडळाने केले आहे.