शिरगाव-रामनगरमध्ये श्री रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 05, 2025 15:16 PM
views 64  views

देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव-रामनगर येथे ५ व ६ एप्रिल रोजी श्रीरामनवमी उत्सव व रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित श्रद्धा, भक्ती आणि उत्साह यांचा संगम घडवत देवगड तालुक्यातील शिरगाव-रामनगर येथील श्रीराम मंदिराचा २५ वा वर्धापनदिन सोहळा ५ एप्रिल आणि श्रीराम नवमी उत्सव ६ एप्रिल रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार ५ एप्रिल रोजी मंदिराच्या वर्धापनदिन सोहळा निमित्ताने सकाळी ८:०० वाजता मंदिरात विष्णू याग आणि लघुरुद्र, होमहवन व आरती, दुपारी १२:३० वाजता महाप्रसाद ,रात्री ८:०० वाजता श्री संत बाळूमामा बाल भजन मंडळ, सरवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) यांच्या भक्तिगीतांचा विशेष कार्यक्रम होणार आहे.

रविवार ६ एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सवानिमित्त सकाळी ७:३० वाजता श्री गणेश पूजन व अभिषेक, त्यानंतर ८:३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२:०० वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा , १२:३० वाजता महाआरती आणि १:०० वाजता महाप्रसाद ,सायंकाळी ४:०० वाजता श्री पावणादेवी बांदेश्वर ढोल पथक आपले दमदार सादरीकरण करणार आहे.

संध्याकाळी ६:०० वाजता हरिपाठ होईल, संतसंग आणि भक्तिगीतांचा मनमोहक अनुभव भाविकांना मिळेल. रात्री ९:०० वाजता २०×२० डबलबारी भजनांचा जंगी सामना रंगणार आहे. यामध्ये बुवा श्रीकांत शिरसाट (ओंम चैतन्यनगरी प्रासादिक भजन मंडळ, वैभववाडी, उंबर्डे-मुंबई) विरुध्द बुवा संतोष जोईल (श्री भुतेश्वर प्रासादिक भजन, खुडी, देवगड) यांच्यात डबलबासी भजनाचा सामना होणार आहे.श्री पावणादेवी बांदेश्वर मंडळाच्या वतीने सर्व कार्यक्रमास भाविकांनी व ग्रामस्थांनी या पवित्र सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री पावणाई बांदेश्वर मंडळ, शिरगाव- रामनगर यांनी केले आहे.