वेंगुर्ल्यात बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आयोजन
Edited by: दीपेश परब
Published on: January 12, 2023 12:09 PM
views 170  views

वेंगुर्ला: २३ जानेवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला तालुका बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने वेंगुर्लेत कबड्डी स्पर्धा, महिलांसाठी हळदी कुंकू याचबरोबर विविध सत्कार आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिली आहे. 

   वेंगुर्ला तालुका बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मासिक सभा ११ जानेवारी रोजी तालुका कार्यालयात संपन्न झाली. 

यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, उपजिल्हाप्रमुख सुनिल मोरजकर, बाळा दळवी, महिला तालुकाप्रमुख प्रतीक्षा पाटकर, कोचरा सरपंच योगेश तेली, उपशहर प्रमुख उमेश येरम, शाखाप्रमुख परेश मुळीक, उभादांडा माजी उपसरपंच गणपत केळुसकर, मितेश परब यांच्यासाहित इतर पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.



      या सभेत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. पक्षाच्या संघटनात्मक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ व २४ जानेवरी रोजी जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा तसेच २३ जानेवारी रोजी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले. 

   यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सचिन वालावलकर, मंत्री दीपक केसरकर यांचे स्वीय साहाय्यक योगेश तेली यांचा कोचरा सरपंच झाल्याबद्दल, राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार सुरेश कौलगेकर तसेच सभेला उपस्थित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.