मोरगावमध्ये स्वातंत्र्यदिनी विविध कार्यक्रम..!

Edited by: संदीप देसाई
Published on: August 16, 2023 16:52 PM
views 297  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. ग्रामपंचायत तर्फे उभारण्यात झालेल्या सोलापूर गावातील माजी सैनिक तथा सुभेदार उमेश सखाराम आहीर यांच्या हस्ते करण्यात आले.सध्या ते सहाय्यक जिल्हा समाजकल्याण अधिकारी म्हणून ओरोस येथे कार्यरत आहेत. यावेळी सरपंच संतोष आहीर यांसह ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी माजी सैनिक रमेश आहीर, शैलेश ठाकूर, सखाराम ठाकूर, चंद्रकांत देऊलकर, लाडोबा दळवी यांनाही ग्रामपंचायतच्या वतीने सन्मानित करण्यात आले. तर आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत शासनाने केलेल्या मार्गदर्शनानुसार गावामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.