सावंत वस मंदिरात १७ एप्रिलला विविध कार्यक्रम

Edited by: विनायक गांवस
Published on: April 17, 2025 12:51 PM
views 106  views

सावंतवाडी : सांगेली सावंत टेंब येथील सावंत वस मंदिरात गुरुवार १७ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.         

यानिमित्त मंदिरात सायंकाळी ३ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद, रात्री महाप्रसाद, त्यानंतर रात्री ८ वाजता ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन, रात्री ९ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, रात्री ९:३० वाजता सातार्डा येथील रेनबो फ्रेंड सर्कल यांचे 'गावय' हे दोन अंकी मालवणी नाटक होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंत टेंब मित्र मंडळ आणि सांगली ग्रामस्थांनी केले आहे.