
मालवण : स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आंबेरी ग्रामपंचायतने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. लोकसहभागातून श्री सकलेश्वर मंदिर परिसरात खच्छता मोहिम राबविताना प्लास्टिक न वापरण्याबाबत ग्रामस्थांच्या माध्यमातून जनजागृती रॅली काढण्यात आली.
स्वच्छता विषयक शासन स्तरावर विविध स्पर्धाचे आयोजन करून त्यामध्ये टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता संदेश रंगविने यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच गावातील ग्रामस्थांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी सरपंच मनोज डिचोलकर, उपसरपंच, रवींद्र परब, सर्व ग्रा.प. सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी सौ. स्वाती कदम यासाह अन्य उपस्थित होते.