हरिहरेश्वर मंदिरच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 11, 2024 12:22 PM
views 217  views

देवगड : श्री हरिहरेश्वर मंदिर तळवडे (लब्दे वाडी) या प्राचीन व जागृत नवसाला पावणारा व हाकेला धावणारा देवस्थानचा १० वा वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. १३ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळपासूनच कार्यक्रमांची रेलचेल सुरू असणार आहे. रविवार दि.१२ मे २०२४ रोजी पालखी सोहळा व महाप्रसाद प्रसाद तसेच रेकॉर्ड डान्स | रात्रीः ९:३० वा.रवळनाथ ढोल पथक मोसम - राजापूर. 

सोमवार दि. १३ मे २०२४ रोजी सकाळी ७वा.अभिषेक, गणेश पूजन, लघु रुद्र स्वाहाकार हे कार्यक्रम होणार आहेत. दु १२.वा श्री सत्यनारायणाची महापूजा,सुस्वर भजन महाआरती, महाप्रसाद दु.१२.३० वा.डबलबारी भजनाचा जंगी सामना बुषा.कुअखिलेश फाळके पडेलकर प्रासादिक भजन मंडळ धालवली, देवगड विरुध्द बुवा. शुभंम पाळेकर श्री. मालवीय भूतनाथ महापुरुष प्रा. भजन मंडळ पाळेकर वाडी, देवगड यांचा आमनेसामने डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे.तसेच सायं.४ वा. शिवलीलामृत ११ वा.अध्याय वाचन,हळदीकुंकू,वामनराव पैं प्रणित हरिपाठ तसेच रात्री.१०वा. रंग खांब ग्रुप निर्मिती रंग मातीचे या विविध लोककलांचा बहारदार कार्यक्रम होणार आहेत .या सर्व कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.