उभाबाजार दैवज्ञ गणपती मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन...!

Edited by: विनायक गावस
Published on: February 12, 2024 14:47 PM
views 184  views

सावंतवाडी : उभाबाजार, सावंतवाडी येथील श्री देव दैवज्ञ गणपती मंदिरात गणपती मूर्ती प्राणप्रतिष्ठा ३४ वा वाढदिवस तसेच माघी गणेश जयंती, नारायण स्वामी पुण्यतिथी व बालाजी उत्सव साजरे केले जाणार आहेत. मंगळवार १३ फेब्रुवारी सकाळी पूजाअर्चा, अभिषेक, सकाळी १०.३० वा. गणेश जन्मावर कीर्तन, दुपारी १२ बाजता गणेशजन्म, दुपारी १२.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत गणेश नामजप व रात्री ९ नंतर भजन, बुधबार १४ फेब्रुवारी सकाळी श्री नारायण स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त पूजा-अर्चा व नंतर स्वामींची समाधी व पादुका पूजा, सकाळी ११ वाजता पावणी व त्यानंतर महाप्रसाद, रात्री भजन, गुरुवार १५ फेब्रुवारी सकाळी श्री बालाजी मठात पूजाअर्चा व नंतर स्वामींची समाधी व पादुका पूजा, अभिषेक व रात्री भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. उत्सवात सहभाग घेऊन प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समिती, श्री देव दैवज्ञ गणपती मंदिर आणि श्री देव दैवज्ञ गणपती मंदिर अध्यक्ष शिवशंकर नेरुरकर यांनी केले आहे.