देवगडमध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 11, 2024 14:14 PM
views 70  views

देवगड : देवगड येथे मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती निमित्त १९ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या वर्षी ची शिवजयंती तेजोमय आणि उत्साहात साजरी होण्यासाठी व देवगड तालुक्यातील या शिवजयंती निमित्त मोठ्या प्रमाणावरती सहभागी होण्याचे आवाहन मराठा समज्याच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे. अशी माहिती संदीप साटम यांनी यावेळी दिलीय.

कला क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्र  यात विशेष प्राविण्य मिळवलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आगाऊ संपर्क योगेश राणे मो.९४२३२०४०५० यांच्याशी  करण्याचे आवाहन करण्यात आलंय.