
सावंतवाडी : हिरकणी नारी शक्ती ट्रस्टच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सविता मेस्त्री या महिलेन आत्मनिर्भर बनण्यास उद्योगाच्या माध्यमातून सुरुवात केली आहे. हिरकणी ट्रस्टच्या सौ. हिराताई पवार, जे.डी. सर यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे, असं मत हिरकणी नारी शक्ती ब्रिगेड कोकण उपाध्यक्ष मानसी परब यांनी व्यक्त करत महिलांनी आत्मनिर्भर बनण्यासाठी पुढं यावं असं आवाहन केलं.