
वेंगुर्ला : युवक व क्रीडा मंत्रालय भारत सरकार च्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने युवक आणि युवतींना नवचेतना देण्याच्या उद्देशाने रविवार दि.०५ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तळवडे सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय 'युवा उत्सव' चे आयोजन करण्यात आले आहे. युवाई मधील सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी कविता लेखन, चित्रकला, मोबाईल फोटोग्राफी, वक्तृत्व आणि समूहनृत्य (लोकनृत्य किंवा देश भक्तीपर) अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर सर्व स्पर्धा १५ ते २९ या वयोगटातील युवक-युवती साठी असून सर्व स्पर्धेसाठी दिनांक ०१ मार्च पर्यंत नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
कविता लेखन स्पर्धेसाठी
१) 'ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आणि बलिदान', २) स्वातंत्र्य लढा, ३) भारताचा समृध्द वारसा, ४) विविधतेेतील एकता, ५) राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान असे विषय असून यातील एक विषय स्पर्धकांना ऐनवेळी स्पर्धा स्थळी दिला जाईल त्यावर कविता लेखन करायचे आहे. कविता ही स्वरचित असली पाहिजे.
चित्रकला स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग मधील लोककला हा विषय असून यासाठी जलरंग वापरणे अनिवार्य आहे. तर चित्रकला साठी आयोजकांकडून कागद देण्यात येईल.
राष्ट्र उभारणीत युवाईची भूमिका हा विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी असून स्पर्धकांनी आपल मत मांडण्यासाठी किमान कालावधी ७ मिनिटे तर कमाल कालावधी ८ मिनिटे असा आहे.
मोबाईल फोटोग्राफी साठी स्पर्धकांना स्पर्धास्थळी विषय आणि वेळ दिला जाईल. त्यांनी नियत वेळेत आपल्या मोबाईलवर फोटो काढून तीन फोटो जमा करायचे आहेत.
वैयक्तिक स्पर्धेव्यतिरिक्त सांस्कृतिक उपक्रमामध्ये समूहनृत्य स्पर्धा आयोजित केली असून यामध्ये लोकनृत्य किंवा देशभक्तीपर समूहनृत्य सादर करायचे आहे. समूहनृत्य प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकसाठी अनुक्रमे रोख ५०००, २५००, १२५० रुपये आणि प्रत्येकी चषक, प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.
कविता लेखन स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा या तिन्ही स्पर्धा प्रकारासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक साठी अनुक्रमे १०००, ७५०, ५०० आणि प्रत्येकी चषक आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.
वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये ५०००, २०००, १००० आणि प्रत्येकी चषक, प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.
सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नेहरू युवा केंद्र जिल्हा समन्वयक मोहितकुमार सैनी आणि वेताळ प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केलं आहे.