डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचा पुढाकार
Edited by: मनोज पवार
Published on: April 15, 2025 12:04 PM
views 186  views

रत्नागिरी : शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते दहिवली येथे भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील व उपस्थित सर्व प्राध्यापक  व विद्यार्थ्यांकडून बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पुजन करत  त्यांना अभिवादन करणयात आले. या प्रसंगी प्राचार्य डाॅ.सुनितकुमार पाटील  यांनी आपले  मनोगत व्यक्त केले.

शिका व संघटीत व्हा हा नारा घेवुन युवकांनी समाज प्रबोधनाचे काम केले पाहिजे. तसेच या समाजाला सामाजिक समता, एकात्मिता व उच्च शिक्षणाचा संदेश दिला पाहीजे असे प्रतिपादन केले. या जयंतीचे औचित्य साधुन महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह 2025 या कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयामध्ये वक्तृत्व, निबंध व रिल मेकींग या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या सर्व स्पर्धांमधे महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

रिल मेकींग स्पर्धेमध्ये हर्ष भुरवणे याने प्रथम,  राज हसपे याने द्वितीय तर श्वेता बेंद्रे व आस्था महाजन यांनी तृतीय क्रमांक मिळवला. निबंध लेखन स्पर्धेमध्ये गौतमी डोंगळे हिने प्रथम व विजय ढेरे याने द्वितीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये दीप्ती वळंजु हिने प्रथम व अपूर्वा देसाई हिने द्वितीय क्रमांक मिळवला. या सर्व विजेत्यांना  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्व स्पर्धांसाठी सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या सिनियर काॅलेज चे प्राचार्य टी.वाय.कांबळे, अध्यापक विद्यालयाच्या डाॅ.जमादार व  सह्याद्रि इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट चे प्रा.तांबे हे परिक्षक म्हणून लाभले.