
दोडामार्ग : माझी वसुंधरा अभियानात सहभागी झालेल्या दोडामार्ग तालुक्यातील मणेरी ग्रामपंचायत कडून विविध उपकम राबविण्यात येत आहेत. लोकसहभागातून व प्रशासनाचं मार्गदर्शन घेत या विविध उपक्रमांची गावांत प्रभावी अमलबजावणी केली जात आहे.
मणेरी ग्रामपंचायतकडून ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रम, आरोग्य उपकेंद्र तसेच जि. प. शाळा येथे विविध प्रकारे लक्षवेधी वॉल पेंटिंग करून गावातील नागरिकांना माझी वसुंधरा योजणेबाबत जनजागृती करण्यात आली आहे. हे पेटींग व त्या माध्यमातून देण्यात आलेले संदेश ग्रामस्थ यांचे लक्ष वेधून घेत आहेत. गांवात प्लास्टिक बंदी, फटाके बंदी, कमी कचरा जाळण्यावर बंदी, याप्रमाणे बंदी घालण्यात आली आहेत.
तसेच जल प्रदुषण रोखणे जनजागृती, बिया संकलन स्पर्धा या प्रमाणे माझी वसुंधरा अंतर्गत मणेरी ग्रामपंचायत ग्राम पातळीवर प्रभाविपणे विविध उपक्रम राबवित आहेत. हे अभियान गावांत अतिशय जबाबदारीने यशस्वी करण्यासाठी गावचे प्रथम नागरिक सरपंच सिद्धी कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी अशोक गायकवाड, ग्रामविस्तार अधिकारी श्रीरंग जाधव व बिडीओ अजिंक्य सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेत आहेत.