
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मोफत आरोग्य शिबीर होत असून मोफत व्हेरिकोज व्हेन्सवरती लेसर द्वारे विनाशस्त्रक्रिया उपचार शिबीर आयोजित करण्यात आल आहे.
व्हेरिकोज व्हेन्स लक्षणे ही पायावर निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या नसा दिसू लागतात. याचे कारण दीर्घकाळ उभं राहणं किंवा चालणं असू शकतं. अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींच्या नसा, पायात जळजळ, पेटके, पायात जडपणा, शिरेच्या वरच्या भागात खाज सुटणे तसेच पाय सुजणे, संध्याकाळी पाय दुखणे, पायामध्ये असहजता निर्माण होणे, असह्य वेदना होणे व त्यामुळे झोप न येणे, व्हेरिकोज व्हेन्स फुगीर व पिळलेल्या दिसतात ज्यामुळे त्या एखाद्या दोरी किंवा तारेप्रमाणे दिसतात. लेसर द्वारे विनाशस्त्रक्रिया असल्यामुळे फक्त १ दिवसच हॉस्पिटल मध्ये रहावे लागते. यासाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक असून शिबिरास येताना रेशन कार्ड व आधार कार्ड ओरिजिनल घेऊन येणे , व्हेनस कलर डॉपलर रिपोर्ट्स घेऊन येणे आवश्यक आहे. महाराष्ट्र मधील कोणता ही रूग्ण उपचार घेऊ शकतो.
सकाळी ११ ते २ या वेळेत १३/१/२०२५ सोमवार उपजिल्हा रुग्णालय कणकवली, १४/१/२०२५ मंगळवार उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी व १५/१/२०२५ बुधवार उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथे हे शिबिर होणार असून अधिक माहितीसाठी संपर्क 7378749409 साधावा.