
मालवण : राज्यस्तरीय मंथन शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता दुसरीचा वेंकटेश जयदेव वरस्कार राज्यात 6 वा, व जिल्ह्यात कोकण विभागात पहिला आला आहे.
इयत्ता दुसरीचा स्वरूप तुकाराम खिल्लारे राज्यात नववा कोकण विभागात चौथा आला आहे. इयत्ता 3 रीचा रिषभ नागेश जाधव राज्यात सातवा व कोकण विभागात पहिला आला आहे. वराड देऊळवाडी शाळेतील विध्यार्थ्यांच्या यशामुळे राज्य स्तरावर जिल्हा नावाजला गेला आहे. ग्रामीण भागातील मुलांची बुद्धिमत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या विध्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिरवलकर व नागेश जाधव या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.