
वेंगुर्ला : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गुरुवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठिक ९ वाजता येथील वेंगुर्ले हायस्कूलमध्ये शिवसेना वेंगुर्ला व शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग यांच्यातर्फे 'वंदे मातरम् समूहगायन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडीने पुरस्कृत केलेल्या श्रावण महोत्सवांतर्गत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
माध्यमिक शाळा व प्राथमिक शाळा अशा दोन गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शाळांना सहभाग घेता येईल. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या १५ संघांना स्पर्धेत सहभाग दिला जाणार असून इच्छूक संघांनी तात्काळ नावनोंदणी करणे अत्यावश्यक आहे. प्राथमिक शाळा गटासाठी प्रथम पाच विजेत्यांना अनुक्रमे रोख ३०००, २५००, २०००, १५००, १००० रुपये, माध्यमिक शाळा गटातील प्रथम पाच विजेत्यांना अनुक्रमे रोख ३५००, ३०००, २५००, २५०० व २००० रुपये तसेच दोन्ही गटातील पहिल्या तीन विजेत्यांना स्मृतीचिन्ह व सहभागी सर्वच संघांना प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेमध्ये संघांनी देशभक्तीपर समूहगायन करणे आवश्यक आहे. एका संघात किमान ५ सदस्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. संघांनी स्वतःची संगीतसाथ स्वतः आणावी. संगीतसाथ करणाऱ्या कलाकारांचा संघामध्ये सामावेश करण्यात येणार नाही. गीतगायनासाठी कमाल ७ मिनीटे एवढा वेळ निर्धारित करण्यात आला आहे. सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या संघानी तात्काळ ९१५८८८१६१८ (महेंद्र) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम व शाश्वत सेवा संस्थेच्या अध्यक्षा मिताली मातोंडकर यांनी केले आहे.