
सावंतवाडी : श्री हनुमान मंदिर वैश्यवाडा उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दीपक म्हापसेकर यांची तर सचिवपदी अण्णा म्हापसेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वैश्यवाडा सावंतवाडी येथील नागरिकांची नुकतीच येथील श्री काडसिद्धेश्वर महाराज मठात बैठक संपन्न झाली. यावेळी आगामी दोन वर्षासाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.
यात अध्यक्षपदी दीपक नागेश म्हापसेकर, उपाध्यक्ष वैशाख प्रकाश मिशाळ, सचिव अण्णा राजेंद्र म्हापसेकर, सहसचिव सिद्धी विकास सुकी, खजिनदार सतीश सदानंद नार्वेकर, सह खजिनदार महेश सदाशिव म्हापसेकर व कार्यकारिणी सदस्य म्हणून संकेत शिरसाट, केतन कालेलकर, सौ. शुभांगी सुकी, सौ. मनाली परब, सौ. सायली मुंज, धोंडी दळवी, प्रसाद म्हापसेकर, दीनानाथ मिशाळ, मिलिंद सुकी, वैभव वाळके, प्रथमेश टोपले, सौ.गीता सुकी, यश जिवणे, सौ.श्रिया टोपले, गोटया पांगम, आनंद आळवे, सल्लागार आनंद नेवगि, संजय म्हापसेकर, सुरेश भोगटे, डॉ.रोहिणी बांदेकर, महेश कोरगावकर, राजू पनवेलकर, भरत नार्वेकर, संतोष मुंज यांची निवड करण्यात आली. विश्वस्त विकास सुकी राहणार आहेत. ही कार्यकारिणी दोन वर्षासाठी राहणार आहे. यावेळी वैश्यवाड्यातील सर्व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक रमाकांत नार्वेकर, माजी अध्यक्ष प्रकाश सुकी, संतोष सुकी, सौ. स्नेहल सुकी, दया नार्वेकर, रंगा म्हापसेकर,अभय म्हापसेकर, राकेश नेवगी, प्रमोद मुंज, संजीवनी शिरसाट, मनोज शिरोडकर तसेच वैश्य वाड्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.