
सावंतवाडी : वैश्य समाज सावंतवाडी तर्फे प्रतिवर्षाप्रमाणे ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा समारंभ रविवार दि. २२ जून २०२५ रोजी सायं. ५ वा. माजी शालेय शिक्षणमंत्री व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य आम. दीपकभाई केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मूळ नारूर, कुडाळ येथील रहिवासी व सध्या मुंबईस वास्तव्यास असेलेले मनोहर रामचंद्र पारकर, उपसचिव आणि सहा. मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना १० वी परीक्षेमध्ये ८० टक्केहून अधिक गुण व १२ वी परीक्षेत ७५ टक्के तसेच माध्यमिक, पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, एमटीएस परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केलेल्या सावंतवाडी तालुक्यातील वैश्य ज्ञातीतील तसेच इतर क्षेत्रातील नेत्रदीपक यश संपादन केलेल्या ज्ञाती बांधवांनी आपल्या गुणपत्रकाच्या किंवा सर्टिफिकेटसहीत छायांकित प्रत शक्यतो मोबाइल नंबरसह १८ जून २०२५ पर्यंत वैश्य भवन कार्यालय, गवळी तिठा, सावंतवाडी येथे कार्यालयीन वेळेत आणून द्यावीत.
अधिक माहिती हवी असल्यास मोबा. नं. ९४२११४९३२५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वैश्य समाज सावंतवाडीचे अध्यक्ष रमेश बोंद्रे यांनी केले आहे.