वैश्य समाज पतसंस्था सिंधुदुर्ग संचालक निवडणुकीत सुनील डुबळे विजयी

Edited by:
Published on: December 25, 2023 21:40 PM
views 114  views

वेंगुर्ला: वैश्य समाज पतसंस्था सिंधुदुर्ग ची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत संचालक मंडळाच्या निवडणुकीत वेंगुर्लाचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना सुनील डुबळे यांचा दणदणीत विजय झाला आहे.  सुनील डुबळे यांनी पतसंस्थेवर गेली ५ वेळा संचालक व व्हाईस चेअरमन म्हणून राहिलेल्या कुडाळ येथील अरविंद शिरसाट यांचा पराभव केला. या निवडणुकीत कुडाळ तालुक्यात ५०० मतदार व वेंगुर्ला मध्ये फक्त १५ मतदार असे असताना कुडाळ येथील अरविंद शिरसाट यांचा पराभव करून वेंगुर्ला येथील सुनील डुबळे यांनी बाजी मारली. सामान्य लोकांमध्ये राहून कसा विजय मिळवता येतो याचे या निवडणुकीत सुनील डुबळे यांनी दाखवून दिले.