
कणकवली : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कणकवलीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत माध्यमिक गटात कासार्डे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी वैदेही पाताडे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
माध्यमिक गट (इयत्ता ८ वी ते १० वी) 'ग्राहक शिक्षण - काळाची गरज' व 'ग्राहक जागृतीचे नवे शिल्पकार' हे विषय होते. या स्पर्धेत द्वितीय श्रेया कदम(विद्यामंदिर प्रशाला, कणकवली), तृतीय आर्या पावले (एस एम हायस्कूल), संकल्प चिंदरकर (माध्य.विद्यामंदिर कनेडी) तर उत्तेजनार्थ सीमा चव्हाण (माध्य. विद्यालय बिडवाडी)व यशश्री मेस्त्री (सरस्वती हायस्कूल नांदगाव) यांनी पारितोषिक पटकाविली. स्पर्धकांना बुधवार २४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा. जिल्हाधिकारी तृप्ती थोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा ग्राहक तक्रार समिती अध्यक्ष इंदुमती मालुष्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हा मुख्यालय ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
विजयी स्पर्धकांनी या कार्यक्रमाला वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र कणकवली तालुका शाखेच्या तालुकाध्यक्षा श्रद्धा कदम, उपाध्यक्षा गीतांजली कामत, संघटक जनार्दन शेळके व सचिव पूजा सावंत, सहसचिव विनायक पाताडे यांनी केले आहे.










