
वैभववाडी : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेंतर्गत तालुका स्तरावर लोरे नं २ गावाने प्रथम क्रमांक पटकावला.पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते १०लाखांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन लोरे नं २ गावाला सन्मानित करण्यात आले.
राज्य शासनाच्यावतीने सन २०२१-२२या वर्षात तालुकास्तरावर ग्रामपंचायतीसाठी " आर आर पाटील सुंदर गाव "योजना राबविली होती.या योजनेच्या निकषात तालुक्यातील लोरे नं २या ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला.सरपंच विलास नावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी याकरिता विशेष मेहनत घेतली होती.महाराष्ट्र दिनी याच सिंधुदुर्गनगरी येथे बक्षीस वितरण पार पडले.पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते या बक्षीसाच सिंधुदुर्गनगरी येथे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, सरपंच विलास नावळे यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक उपस्थित होते.