
वैभववाडी : वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र जनार्दन बोडेकर यांची ठाणे-पालघर जिल्हा वन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. बोडेकर हे मुंबई रेंज प्रादेशिक वनपरिमंडळ अधिकारी कुर्ला येथे वनपाल म्हणून कार्यरत आहेत.
श्री बोडेकर हे मुळ वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावचे आहेत. ठाणे येथून त्यांच्या सेवाचा प्रारंभ झाला. येथील वनविभागात २००४ मध्ये मुरबाड तालुक्यातील टोकावडा या अतिदुर्गम भागात उत्तर रेंज मधील तळेगाव बीट येथे वनरक्षक म्हणून रुजू झाले. त्यांना २०२० मध्ये गस्तीपथक मांडवी वनपाल पदी बढती मिळाली असून ते आता ठाणे वनविभागातील मुंबई रेंज प्रादेशिक वनपरिमंडळ अधिकारी वनपाल, कुर्ला येथे कार्यरत आहेत.
सन २०१८ मध्ये ठाणे जिल्हा वनकर्मचारी पतसंस्थेचे 'व्हीजेएनटी' राखीव प्रवर्गातून बिनविरोध संचालक म्हणून निवडून आले होते. २०२३ पासून पतसंस्थेच्या सचिव पदावर असून या पदावर काम करताना संस्थेच्या कार्यक्षेत्रात वाढ करुन पतसंस्थेचा ठाणे व पालघर जिल्हा वन कर्मचारी सहकारी पतसंस्था असा विस्तार करण्यात आला आहे. त्यांचे सामाजिक कार्यात योगदान असून आता ठाणे-पालघर जिल्हा वन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण प्रवर्गातून संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जनार्दन बोडेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.