
वैभववाडी : सोनाळी वाणीवाडी येथील वयोवृद्ध महीलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेविरोधात तालुकावासीय आज (ता.४) एकवटले. येथील शहरात जोरदार घोषणाबाजी करीत त्या घटनेच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. त्यानंतर पोलीस निरीक्षकांशी भेट घेत संशयित आरोपीस अधिकाधिक शिक्षा व्हावी असा तपास करावा अशी मागणी पोलीसांकडे केली. पोलीसांनीही आपला तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट केले.
सोनाळी वाणीवाडी येथील जयश्री साटम या महिलेचा मंगळवारी रात्री साडेसात वाजण्यच्या सुमारास निर्घुण खुन करण्यात आला.संशयित आरोप सचिन निखार्गे हा सरपंचांना घटनास्थळी हत्यार हातात घेवुन निर्दशनास आला होता.या प्रकाराने संपुर्ण तालुका हादरून गेला होता.पोलीस अधीक्षक,अतिरिक्त पोलीस अधीक्षक,विभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी येत तपासाविषयी सुचना केल्या होत्या.संशयिताला पोलीसांनी दीड तासांत ताब्यात घेतले होते.
मात्र, श्रीमती साटम यांची क्रुर पध्दतीने हत्या केली होती.त्यामुळे सर्वच क्षेत्रातुन या घटनेचा निषेध केला जात होता.विविध राजकीय पक्षांनी पोलीसांना निवेदन दिली.मात्र आज सोनाळी,नावळेसह विविध गावांतील राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मंडळी या क्रुर प्रवृत्तीविरोधात एकवटली.यामध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष नासीर काझी,प्रमोद रावराणे,अरविंद रावराणे,नेहा माईणकर,संजय सावंत,स्नेहलता चोरगे,प्राची तावडे,भीमराव भोसले,संजय रावराणे,सुनील रावराणे,प्रकाश पाटील,अशोक रावराणे,संभाजी रावराणे,सोनल गुरव,यांच्यासह शेकडो नागरिकांनी दत्तमंदीर ते पोलीस स्थानक असा निषेध मोर्चा काढला.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.क्रुर प्रवृत्तीचा निषेध असो,पोलीस प्रशासन झिंदाबांद अशा घोषणा देण्यात आल्या.त्यानंतर नागरिकांनी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना सोनाळी सरपंच,सोनाळी महिला मंडळ,नगरपंचायत वाभवे वैभववाडी,भाजपा महिला आघाडी यांनी निवेदने दिली.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या दुरध्वनीवरून आ.नितेश राणे यांनी पो.नि.मेंगडे यांच्याशी संवाद साधला.संशयित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशा पद्धतीने तपास करावा.अशा प्रवृत्ती या तालुक्यात पुन्हा उद्भवू नयेत याकरिता खबरदारी घ्यावी अशी सूचना पोलिसांना दिली.यावेळी श्री.मेंगडे यांनी सोनाळी खुन प्रकरणाचा तपास योग्य दिेशेने सुरू आहे.या प्रकरणातील अधिकाधिक पुरावे आम्ही गोळा करीत आहोत.दोषारोपपत्रासह सर्व पुरावे आम्ही न्यायालयात सादर करू असे त्यांनी स्पष्ट केले.