
वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील उबाठा सेनेचे पदाधिकारी दत्ताराम गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत वैभववाडी येथे हा पक्षप्रवेश पार पडला. या घडामोडीमुळे कोकिसरे परिसरात उबाठा सेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
मंत्री राणे यांनी भाजपात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करत संघटन वाढीसाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. भाजपाचे विकासाभिमुख धोरण आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही पक्षात प्रवेश केल्याचे मत यावेळी दत्ताराम गुरव यांनी व्यक्त केले.या पक्षप्रवेशात कोकिसरेचे माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन पोरलेकर, कुंभारवाडीचे अध्यक्ष सदानंद खेडेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिता कुडाळकर यांच्यासह दीपक निळेकर, तुकाराम गुरव, सखाराम गुरव, संदीप सावंत, रमेश कुडाळकर, विठोबा कुडाळकर, संतोष कुडाळकर, मंगेश कुडाळकर, प्रकाश कुडाळकर, अनंत पेडकलकर, संजय पेडकलकर, सूर्यकांत खेडेकर, अशोक निळेकर, अनंत खेडेकर, प्रकाश राऊत, नारायण कोरलेकर, सुशांत सांगवेकर आदींसह महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने समावेश होता.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजप कार्यालयासमोरील पटांगणावर मंत्री नितेश राणे यांची सभा पार पडली. याच सभेदरम्यान हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, शारदा काबळे, प्राची तावडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










