सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी सभा संपन्न

शासनाच्या दिरंगाईविरोधात तीव्र नाराजी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 11, 2026 15:52 PM
views 53  views

वैभववाडी : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना – जिल्हा शाखा, सिंधुदुर्ग यांची जिल्हा कार्यकारिणी सभा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात नुकतीच पार पडली. या सभेत निवृत्ती धारकांचे शासनाने देयक प्रलंबित ठेवल्याबद्दल सर्वांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या कार्यकारिणीची सभा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद नारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेस जिल्हा सरचिटणीस नितीन जठार, राज्य उपाध्यक्ष सन्माननीय  गुंडू चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष अशोक कासकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख उदय शिरोडकर, जिल्हा सहसचिव  प्रकाश कोचरेकर यांच्यासह  नंदकुमार येरागी,  वासुदेव मराठे, रमेश मालंडकर, रमेश चव्हाण,  नाना सारंग, वसुंधरा चव्हाण तसेच सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष व तालुका सरचिटणीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सभेमध्ये शासनाकडून डिसेंबर २०२४ पासून सेवानिवृत्त सभासदांना देय असलेले आर्थिक लाभ तसेच विविध प्रलंबित मागण्यांबाबत होत असलेल्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रश्नांबाबत जिल्ह्यातील सर्व शीर्षस्त  अधिकारी व पालकमंत्री नितेश राणे यांना पुनर्निवेदन देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.याचबरोबर  ज्येष्ठ सेवानिवृत्त सभासदांना मार्गदर्शन व सत्कार करण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी २०२६ मध्ये संपूर्ण जिल्ह्यातील सेवानिवृत्त सभासदांचा भव्य मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मेळाव्याबाबत सविस्तर माहिती मान्यवर नेते व अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेनुसार लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सभेचा समारोप संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी एकजुटीचा निर्धार व्यक्त करून करण्यात आला.