
वैभववाडी : पिरामल स्वास्थ्य संस्थेमार्फत करुळ भट्टीवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ग्रामस्थांसाठी मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात येणार असून, तपासणीनंतर उपलब्धतेनुसार आवश्यक औषधेही मोफत दिली जाणार आहेत.हे आरोग्य शिबिर उद्या शनिवार (ता.९) सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे. या शिबिराचा लाभ ३० वर्षांवरील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या ग्रामस्थांना यापूर्वीपासून मधुमेह, रक्तदाब अथवा इतर आजारांवरील औषधे सुरू असतील, त्यांनी ती औषधे किंवा डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन तपासणीवेळी सोबत आणावे, अशी सूचना देण्यात आली आहे.आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमाचा गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.










