
वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील तिथवली येथे हत्तीरोग सदृश्य लक्षणे असलेला परराज्यातील एक रूग्ण आढळून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सदर रूग्ण उत्तरप्रदेशातील फतेहाबाद येथील असून तो डिसेंबर अखेरीस तिथवलीत दाखल झाला होता. त्याचे नमुने पुढील तपासणीसाठी जिल्हास्तरावर पाठविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील परराज्यातून आलेल्या कामगारांचे युद्धपातळीवर सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले असून आरोग्य विभागाकडून खबरदारीचे उपाय राबविले जात आहेत.










