
वैभववाडी : आचिर्णे गावची ग्रामदेवता श्री रासाई देवीच्या जत्रोत्सवास मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. सकाळी विधिवत पूजन करून देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत जत्रोत्सवाचा शुभारंभ झाला. जत्रोत्सवाच्या प्रारंभी मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती. गावातील पारंपरिक रितीरिवाज जपून हा उत्सव साजरा करण्यात येत असून संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण आहे. पूजेनंतर भाविकांसाठी देवीचे दर्शन खुले करण्यात आले आहे.
जत्रोत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान सल्लागार उपसमिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.










