
वैभववाडी : कोकीसरे नारकरवाड येथील श्री अंबाबाई देवालय येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे. बुधवार दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी येथे श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न होणार आहे. या भक्तिमय सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन नारकरवाडी उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अखंड हरिनाम सप्ताह व सत्यनारायण पुजेनिमित्त हरिनाम गजर, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. या पवित्र सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.










