
वैभववाडी : कुसूर गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व देवी दारुबाईचा "वाडिया" जत्रोत्सव १८ व १९ नोव्हेंबरला होणार आहे.या यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. कुसुरचा "वाडिया" उत्सव तालुक्यातील एका मोठा जत्रोत्सव म्हणून ओळखला जातो.दरवर्षी कार्तिकी महीन्यातील शिवरात्री अमावास्येला हा जत्रोत्सव साजरा होतो.यावर्षीही १८व १९नोव्हेंबरला हा जत्रोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे.जत्रोत्वाला मंगळवार( ता.१८) नोव्हेंबरला प्रारंभ होणार आहे.पहील्या दिवशी देवतांची पुजा,मांड भरणे, नेवैद्य, दिपोत्सव आदी कार्यक्रम होणार आहे.दुस-या दिवशी (ता.१९) सकाळपासून भाविकांसाठी दर्शन खुले असणार आहे.या दिवशी ओटी भरणे,नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहे.या दिवशीच सायंकाळी जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.
या जत्रोत्सवासाठी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.तसेच मंदीराला रंगरंगोटी करून सजविण्यात आले आहे.मंदीर उत्सवासाठी सज्ज झाले आहे.या उत्सावाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान मंडळाकडून करण्यात आले आहे.










