
वैभववाडी : तालुक्यातील लोरे नं २गावातील विविध विकास कामांचे भाजपचे युवा नेते सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.गावातील विकास कामे मार्गी लागल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
लोरे गावातील विकास कामांसाठी पालकमंत्री नितेश राणेंनी निधी उपलब्ध करून दिला.गावचे सरपंच विलास नावळे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.त्यांच्या या मागणीनुसार जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला.या निधीतून सकपाळवाडी रस्ता डांबरीकरण करणे, मांजलकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकर करणे, मोहन मांजलकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता खडीकरण करणे आदी विकास कामे करण्यात येणार आहेत.या कामांचे भूमिपूजन श्री.रावराणे यांच्या हस्ते झाले . यावेळी सरपंच विलास नावळे, भाजपचे रितेश सुतार, प्रकाश गव्हाणकर, भरत मांजलकर, दत्ताराम कदम ,गुरुराज डोंगरे , अण्णा मांजलकर, शिवाजी कदम, दिगंबर पानकर ,नाना रावराणे, छोटू रावराणे ,ज्ञानेश्वर सकपाळ, बाळा सकपाळ, नारायण म्हादेये यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल सरपंच नावळे यांनी पालकमंत्री नितेश राणेंचे आभार मानले.










