
वैभववाडी : अग्निपथ योजनेअंतर्गत होणाऱ्या आगामी सैन्य भरती मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर वैभववाडीत अग्निवीर, सैन्यदल व पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण शिबिराचे आनंदीबाई रावराणे महाविद्यालय उद्या बुधवार, दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे.इच्छुकांनी या शिबिरात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
या भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरात भारतीय सैन्य, अग्निवीर तसेच पोलिस भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती, शारीरिक तयारीचे मार्गदर्शन तसेच आवश्यक कागदपत्रांची तपशीलवार माहिती दिली जाणार आहे. उमेदवारांनी या शिबिरास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक समिती सचिव प्रमोद रावराणे यांनी केले आहे.










