
वैभववाडी : एडगाव शुक नदीच्या पुलावर मातीच्या भरावात माल वाहतूक करणारा ट्रक रुतला.यामुळे तळेरे-कोल्हापुर मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली.
तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर एडगाव शुक नदीच्या पुलावर रस्त्याचे काम सुरू आहे. याकरिता तेथून एकेरी वाहतूक सुरू आहे. दरम्यान, दुपारी १२.३० च्या दरम्यान गगनबावड्याहून तळेरेच्या दिशेने जाणारा ट्रक या पुलाजवळ आला. येथील कामगारांकडून वाहतूकीच नियोजन सुरू असतानाच ट्रक चालकाने ट्रक या मार्गावरून पुढे आणला. यावेळी माल भरलेला ट्रक मातीच्या भरावात फसला. रस्त्याचा निम्म्याहून अधिक भागात ट्रक उभा असल्याने अवजड वाहने जाण्यासाठी जागा उपलब्ध नाही, यामुळे अनेक अवघड वाहने दोन्ही बाजूंनी थांबविण्यात आली आहेत. ट्रक बाजूला हटविण्याचे काम सुरू आहे.










