उंबर्डे फोंडा रस्ता क्रॉक्रिटीकरण व्हावा

पालकमंत्र्यांकडे मंगेश लोके यांची निधीची मागणी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 16, 2025 10:33 AM
views 214  views

वैभववाडी : उंबर्डे–फोंडा हा राज्य मार्ग सातत्याने नादुरुस्त होत असतो.या मार्गाचे क्रॉक्रिटीकरण होण गरजेच आहे , याकरिता  १२५ कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.

उंबर्डे–वैभववाडी–फोंडा–कनेडी–कणकवली–आचरा या राज्य मार्गावरील उंबर्डे–फोंडा हा भाग सध्या अतिशय खराब अवस्थेत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असून काहींना जीव गमवावा लागला आहे.या रस्त्यासंदर्भात श्री. लोके यांनी  पालकमंत्री नितेश राणे यांची मुंबई येथे भेट घेतली.या मार्गाची अवस्था मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अंदाजे १२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.त्यांच्या मागणीबाबत मंत्री राणेंनी सकारात्मकता दर्शविली आहे.