
वैभववाडी : पंचायत समितीच्या सहा जागांसाठी आज आरक्षण जाहीर होणार आहे.अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. नेमक काय आरक्षण पडणार याची उत्सुकता सा-यांना लागली आहे.
तालुक्यातील पंचायत समितीच्या सदस्य पदांसाठी आज तहसीलदार कार्यालयात आरक्षण होणार आहे. काही दिवसांपूर्वी सभापती पदाच आरक्षण जाहीर झालं. सभापती पदाच आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झालं आहे. आता सदस्यांसाठी आज होणा-या आरक्षणामुळे खरं चित्र स्पष्ट होणार. अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. या सोडतीत कोणाला धक्का बसणार व कोणाला लॉटरी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.










