
वैभववाडी : कुसूर पिंपळवाडी येथील छायाचित्रकार व संकल्प फोटो स्टुडिओचे मालक सचिन सावंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोनाळी येथील जंगलात झाडाला साडीने गळफास घेऊन जीवन संपवले .हा प्रकार आज सकाळी निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांची मुलगी,आई असा परिवार आहे.










