
वैभववाडी : वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळावर बॅकेचे प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या दिलीप रावराणे यांचे संघाच्या संचालक मंडळाकडून आज येथील शासकीय विश्रामगृहात सत्कार करण्यात आला.
श्री रावराणे यांची काही दिवसांपूर्वी खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळावर बॅकेचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती.या निवडीनंतर संघाच्या आजच्या सभेत संचालक मंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे,व्हा.चेअरमन अंबाजी हुंबे, संचालक दिगंबर पाटील, सुधीर नकाशे, पुंडलिक पाटील,सीमा नानीवडेकर, उज्वल नारकर,महेश रावराणे,महेश गोखले यासह सहकार क्षेत्रातील विविध मंडळी उपस्थित होते.