
वैभववाडी : ठाकरे शिवसेनेच्या येथील संपर्क कार्यालयाचे उद्या (ता. १२) उद्घाटन होणार आहे. माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यालयाच शुभारंभ करण्यात येणार आहे.
ठाकरे शिवसेनेचे संपर्क कार्यालय येथील पोलीस स्थानकासमोरानजीकच्या इमारतीत सुरू करण्यात येत आहे. मंगळवारी या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ होणार आहे. यावेळी उपनेते बाळ माने, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संदेश पारकर,विधानसभा प्रमुख सतिश सावंत,अतुल रावराणे, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, नंदु शिंदे,मंगेश लोके आदी उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्ताने संभाजी चौक ते नुतन कार्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे.यामाध्यामातून ठाकरे शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार आहे.या कार्यक्रमाला तालुक्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.