
वैभववाडी : कोकीसरे खांबलवाडी नजीक नदी पात्रात सापडलेला मृतदेह हा शिराळे येथील नारायण केशव पाटील व(य७०)या वृद्धाचा आहे.त्यांच्या नातेवाईकांनी ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेतला.
मयत पाटील हे १जुलै पासून घरातून बेपत्ता होते.त्यांची पत्नी वैशाली पाटील यांनी पती बेपत्ता असल्याची फिर्याद पोलीसात २जुलैला दिली होती.त्यांनंतर ३जुलै पशुवैद्यकीय दवाखान्यानजीक जुन्या रस्तावर पाटील यांचं आधार कार्ड, चप्पल, एसटी महामंडळाचे ओळखपत्र सापडले होते.आज शुक नदीच्या पात्रात खांबलवाडी नजीक त्यांचा मृतदेह बोर्चीवाडी येथील रवी शिवगण या गुराख्यला दिसून आला.त्याने गावचे पोलीस पाटील साक्षी टक्के यांना याबाबत माहिती दिली.या घटनेची माहिती मिळताच पोलीस अभिजित तावडे, धनाजी धडे, किरण मेधे हे घटनास्थळी पोहचले.त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढला.मृतदेहाची ओळख पटल्यानंतर शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.