
वैभववाडी : इंदोर येथून आरामबसने गोव्याकडे निघालेल्या उत्तरप्रदेश येथील अर्चना बहादुर देवी (वय-१४)या घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला वैभववाडी पोलीसांनी करूळ तपासणी नाक्यावर ताब्यात घेतले.सध्या तिला सावंतवाडी येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
इंदोरवरून गोव्याकडेन निघालेली आरामबस (क्रमांक एआर,बी २०२३)आज (ता.७)दहा वाजण्याच्या सुमारास करूळ तपासणी नाक्यावर आली.यावेळी आराम बसचालक संजय राठोड (रा.इंदोर) यांनी आपल्या बसमध्ये एक संशयित अल्पवयीन मुलगी इंदोरपासुन प्रवास करीत असल्याचे पोलीसांनी सांगीतले.पोलीस कॉन्स्टेंबल सुरज पाटील,पोलीस नाईक उध्दव साबळे यांनी त्या बालिकेकडे विचारणा केली.परंतु काहीही बोलत नव्हती.त्यामुळे तिला वैभववाडी पोलीस स्थानकात आणण्यात आले.तेथे महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची चौकशी केली असता तिने आपले नाव अर्चना बहादुर देवी (रा.ग्रामपोस्ट बेताहानीय,करूहिया,बलरामपुर,उत्तरप्रदेश)असे सांगुन आपली भाभी गोवा येथे राहते.आपण तिच्याकडे जात असल्याचे सांगीतले.त्यानतंर पोलीसांनी गोव्यातील त्या महिलेशी संपर्क साधला असता तिने अर्चना आपली कुणीही नातेवाईक नसल्याचे सांगीतले.त्यानतंर पोलीसांनी अर्चनाच्या घरी उत्तरप्रदेशला सपंर्क साधला.वडील रामबहादुर देवी यांनी अर्चना घरात काहीही न सांगता निघून गेली आहे.तिला घेवुन जाण्यासाठी आपण येत आहोत असे सांगितले.सध्या त्या मुलीला सावंतवाडी येथील सुधारगृहात ठेवण्यात येणार आहे.