
वैभववाडी : नाधवडे येथील विठ्ठल रखुमाई देवस्थानसाठी नियोजन मधून भरघोस निधी उपलब्ध करून देऊ.येथील सर्व समस्या दुर केल्या जातील असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
आज आषाढी एकादशी निमित्त पालकमंत्री नितेश राणेंनी नाधवडे येथे विठ्ठल रखुमाईच दर्शन घेतले. उत्सव समितीच्यावतीने मंत्री राणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बोलताना राणे म्हणाले येथील मंदिरातील विविध समस्या येथील लोकप्रतिनिधींनी माझ्या समोर मांडल्या आहेत.
त्या अडचणी पालकमंत्री म्हणून मी नक्कीच सोडवणार आहे.जिल्हा नियोजन मधून याकरिता भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले.यावेळी माजी जि.प.सदस्य सुधील नकाशे, सरपंच लीना पांचाळ, उपसरपंच प्रफुल्ल कोकाटे, महीला भाजपा तालुकाध्यक्ष प्राची तावडे, माजी उपसभापती बंड्या मंजरेकर ,बाबा कोकाटे, रमेश इस्वलकर,मधुकर शेट्ये, परशुराम इस्वलकर यासह नाधवडे उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.