
वैभववाडी : येथील अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे कृषी दिन साजरा करण्यात आला.या निमित्ताने एन.सी.सी. विभागाच्या वतीने परसबागेत शेवगा व फळभाज्यांच्या रोपांची लागवड करण्यात आली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, एस.बी.शिंदे,एन.सी.सी विभाग प्रमुख एस.टी.तुळसणकर, पी.बी.पवार, कलाशिक्षक एम.एस. चोरगे तसेच ए.जी. केळकर, एस.एस. पाटील., पी.पी.सावंत, एस.व्ही.भोसले, ए.एस.परिट, जे.एस.बोडेकर, एस.ए.सबनिस, शिक्षकेतर कर्मचारी पी.पी.कोकरे, आर.एम.फुटक, एस.जे.रावराणे, एम.आर.रावराणे, पी.पी.साखरपेकर, एन.सी.सी विद्यार्थी उपस्थित होते.