वैभववाडीत गोवा बनावटीची दारू पकडली

कारसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 27, 2025 20:04 PM
views 1161  views

वैभववाडी : गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी कार वैभववाडी पोलीसांनी पकडली.ही कारवाई गुरुवारी  येथील संभाजी चौकात कारवाई काल (ता.२७)रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.गोवा बनावटीची २ लाख ३० हजार रूपये किमंतीच्या दारूसह  १० लाखांची कार पोलीसांनी ताब्यात घेतली. 

वैभववाडी पोलीसांकडून गुरुवारी रात्री येथील संभाजी चौकात  नाकाबंदी करण्यात आली होती.यावेळी प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात होती.दरम्यान रात्री १२.३०च्या सुमारास तळेरेहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी एक कार संभाजी चौकात आली.ही कार तपासणीसाठी थांबवली.गाडीत असलेल्या मालाबाबत चालकाकडे विचारणा केली असता,त्यांची संशयास्पद उत्तरे आली.त्यानंतर पोलीसांनी गाडीची तपासणी केली असता २लाख ३०हजार रुपयांची दारू सापडली.पोलीसांनी कारसह १२लाख ३०हजारांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी  चालक जट्टेप्पा वंदाले वय-४२( रा. कुमठे,ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर)व सहकारी  माळसिद्धप्पा परमेश्वर प्रधाणीयवर वय-३८ ( रा. हिरे रोगी, ता. इंडी, जि. विजापूर राज्य कर्नाटक) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले पोलीस कॉन्स्टेबल राहुल तळस्कर, हरीश जायभाय, अजय बिल्पे, अजित पडवळ, गणेश भोवड, सागर मासाळ, संतोष माने, दीपेश कानसे या पोलीस पथकाने केली.