
वैभववाडी : वैभववाडी तालुका पत्रकार समिती यांच्यावतीने तालुक्यातील १० वी १२तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा बुधवार दि १८जुन ला शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सकाळी ११वा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला तहसीलदार सुर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल आदी उपस्थित राहणार आहेत.विद्यार्थाना करीअर बाबत मार्गदर्शन आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे करिअर कट्टा विभागाचे प्रा.अजित दिघे करणार आहेत.या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे व सचिव मारुती कांबळे यांनी केले आहे.