
वैभववाडी : वैभववाडी तालुका पत्रकार समितीच्या तालुका अध्यक्ष पदी प्रकाश काळे तर सचिव पदी मारुती कांबळे, उपाध्यक्ष मोहन पडवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणुक निरीक्षक आनंद लोके व गणेश जेठे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील समितीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.त्यानुसार आज (ता.२५) वैभववाडी तालुका समितीची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.याकरिता निवडणूक निरीक्षक म्हणून परिषदेचे प्रतिनिधी गणेश जेठे व जिल्हा उपाध्यक्ष आनंद लोके उपस्थित होते.यांच्या उपस्थितीत तालुका समितीची सर्वसाधारण सभा संपन्न झाली.या सभेत सर्वानुमते नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्ष प्रकाश काळे, उपाध्यक्ष मोहन पडवळ, सचिव मारुती कांबळे, सहसचिव स्वप्नील कदम, खजिनदार प्रा. सुरेश पाटील, सदस्य एकनाथ पवार, उज्वल नारकर, किशोर जैतापकर, नरेंद्र कोलते, श्रीधर साळुंखे, महेश रावराणे यांची निवड करण्यात आली.निवडीनंतर श्री काळे यांचं जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.यावेळी जिल्हा सचिव बाळा खडपकर,माजी जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत, संजय पेटकर,दिनेश साटम आदी उपस्थित होते.निवडीनंतर बोलताना श्री काळे म्हणाले,आपण जो माझ्यावर विश्वास दाखवला तो सर्वांच्या साथीने सार्थकी लावेन.तसेच मी जरी अध्यक्ष असलो तरी आपण सर्व सर्वजण अध्यक्ष आहात असे समजून समितीचे प्रामाणिक काम करुया असं आवाहन केलं.जिल्हा उपाध्यक्ष किशोर जैतापकर यांनी सर्वांचे आभार मानले.