
वैभववाडी : प्रशिक्षणार्थी तहसीलदार प्रसनजित चव्हाण यांनी वाळू माफियांविरोधात धडक मोहीम राबवली.दोन दिवसांत नऊ ट्रकवर कारवाई केली आहे. बुधवारी रात्री ओव्हरलोड वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक महसूलच्या पथकाने पकडले आहेत. दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयात सुरू आहे.तहसिलदार यांच्या धडक कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.