
वैभववाडी: तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. १५ जागांसाठी फक्त १५ नामनिर्देशनपत्र आले.त्यामुळे गेल्या पंधरा वर्षाची बिनविरोधची पंरपंरा यावर्षी देखील कायम राहीली आहे.सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्रित येत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले.
तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी शुक्रवारी ता.१४ अतिंम दिवस होता.तालुक्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे यावर्षी निवडणुक होईल अशी शक्यता निर्माण झाली होती.परंतु तालुका संघात गेल्या काही वर्षापासुन काम करणाऱ्या काही संचालक मंडळीनी पुढाकार घेत निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले.अखेर अतिंम दिवशी प्रमोद रावराणे,दिगबंर पाटील,गुलाबराव चव्हाण,सीमा नानीवडेकर,अंबाजी हुंबे,संजय रावराणे,पुंडलिंक पाटील,जयसिंग रावराणे,सुहास सावंत,महेश रावराणे,उज्वल नारकर,रविंद्र इंदुलकर,रंजिता रावराणे या पंधरा उमेद्वारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली.एका जागेसाठी एकच अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे ही निवडणुक आता बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे.
तालुका खरेदी विक्री संघावर निवडणुक खर्चाचा आर्थीक बोजा पडु नये आणि संघातील वातावरण बिगर राजकीय राहावे यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले.गेल्या पंधरा वर्षात संघाची निवडणुक झालेली नाही.तीच पंरपंरा यावर्षीही कायम राहीली आहे.