वैभववाडी खरेदी विक्री संघाचे पुरस्कार जाहीर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 20, 2025 20:41 PM
views 101  views

वैभववाडी : वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे पुरस्कार चेअरमन प्रमोद रावराणे यांनी जाहीर केलेत. कृषीक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. हे पुरस्कार २७सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

खरेदी विक्री संघाच्यावतीने दरवर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरस्काराने गौरविले जाते. याहीवर्षी या हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये उत्कृष्ट भात पीक शेतकरी सांगुळवाडी येथील संभाजी घनश्याम रावराणे, काजू पीक उत्पादक एडगाव येथील विलास महादेव देसाई, ऊस उत्पादक शेतकरी लोरे गावाचे सरपंच विलास शिवराम नावळे, प्रयोगशील शेतकरी गौरी विलास  माईनकर(तिथवली), पशु पालक शेतकरी नाधवडे येथील अरविंद रघुनाथ पेडणेकर यांना तर भरड धान्य (नाचणी) उत्पादक म्हणुन मांगवलीतील गोपाल कृष्ण बचत गट समूहाला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

हे सर्व पुरस्कार २७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत अशी माहिती संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे यांनी दिली.