
वैभववाडी : नाधवडे येथील एका क्रशरवर दोन कामगारांची त्यांच्याच सहका-याने हत्या केली. चाकूने दोघांना भोसकून संपविले. हा प्रकार बुधवारी रात्री १०.३०च्या दरम्यान घडला. खुन्याला वैभववाडी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकाराने वैभववाडी हादरली. आर्थिक देवाणघेवाणीवरुन हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.